पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

पंतप्रधान मोदीं

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे मुंबई पोलिसांनी बुधवारी (१२ फेब्रुवारी) सांगितले. ज्या व्यक्तीने हा फोन केला त्याला अटक करण्यात आली आहे. तो मानसिक आजारी असल्याचे सांगितले जात आहे.

 

या घटनेसंदर्भात पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता ज्यामध्ये दहशतवादी पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा देण्यात आला होता. पंतप्रधान मोदी सध्या अधिकृत परदेश दौऱ्यावर आहेत. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला.

 

पंतप्रधान मोदींचे हे विमान त्याच्या खास वैशिष्ट्यांमुळे जगातील सर्वात महागड्या विमानांपैकी एक आहे. भारताने बोईंगकडून खरेदी केलेल्या दोन विमानांची किंमत ८,४५८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच एका विमानाची किंमत ४२२९ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षेसाठी त्यावर ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here