मिरज येथे बारावी परीक्षेच्या टेन्शनने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

आत्महत्या
file photo

सांगली (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : शहरातील भारतनगर परिसरातील विद्यार्थ्याने बारावी परीक्षेपूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जेवणासाठी आला नाही म्हणून पालक त्याच्या खोलीत गेले असता, त्याने अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

 

प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८) हा शहरातील भारतनगर येथे पालकांसमवेत राहत होता. तो मिरजेतील एका खासगी अकॅडमीत बारावीचे शिक्षण घेत होता. मंगळवारपासून बारावीचे पेपर दरम्यान, यापूर्वी सोमवारी सायंकाळी संबंधित अकॅडमीमध्ये बारावीचा पेपर कसा सोडवायचा, याबाबत माहिती देण्यात आली होती. अकॅडमीमधून प्रथमेश रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर तो अभ्यासासाठी घराच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत गेला. नंतर त्याने खोलीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी पालकांनी प्रथमेश याला हाक मारली. परंतु, प्रथमेश याने कोणतेही उत्तर न दिल्यामुळे पालकांनी प्रथमेश याच्या खोलीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्रथमेश याने अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here