हॉलीबॉल स्पर्धेतील यशाबद्दल अनुज ज्ञानेश्वर बनसोडे यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार

अनुज ज्ञानेश्वर बनसोडे
हॉलीबॉल स्पर्धेत मान्यवरांचे हस्ते विजयाची ट्रॉफी स्वीकारताना अनुज ज्ञानेश्वर बनसोडे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : राहता तालुक्यातील साकुरी येथील अनुज ज्ञानेश्वर बनसोडे याने एम आय टी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आळंदी पुणे या महाविद्यालच्या मार्फत वार्षिक स्नेह संमेलन आयोजित भव्य अशी हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

पुणे सारख्या शिक्षणाचे माहेर घर असलेल्या अत्यंत चुरशीच्या व अटी तटीच्या या लढतीमध्ये अनुज ज्ञानेश्वर बनसोडे या बहादर विद्या र्थ्याने आपल्या अक्कल हुशारीने सदर खेळाचे कॅप्टन पद मिळउन हा अटीतटीचा सामना जिंकला आहे.. अनुज बनसोडे याचे या खेळातील खिलाडी वृत्तीने व हूनर बाजीने प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारी ही त्याची अतिशबाजी शेवटी या चुरशीच्या लढती तील विजयाचा महामेरू ठरली.

 

अनुज ज्ञानेश्वर बनसोडे हा राहता तालुक्यांतील साकुरी सारख्या अती ग्रामीण भागातील असून तो एम आय टी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आळंदी पुणे या महाविद्यालयात बी एस सी अनिमेशन या वर्गात प्रथम वर्षा करिता प्रवेशित आहे.. त्याच्या या हॉलीबॉल स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीने त्याने सदर महाविद्यालयाचे व आपल्या साकुरी गावाचे नाव उंचावले आहे. अनुज यास महाविद्यालयामार्फत ट्रॉफी प्रमाणपत्र.व मेडल देऊन उपस्थीत विषेश मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले आहे.

अनुज बनसोडे हा विद्याथी रयत शिक्षण संस्थेतील मा. प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांचा मुलगा आहे. या पूर्वीही अनुज बनसोडे याने विवीध क्रिडा स्पर्धा मध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले असून नाव लौकिक मिळवला आहे… त्यांचे या येश्याबद्दल त्याने आपल्या महाविद्यालयाचे व. साकुरी गावचे नाव उंचावले आहे.. एम आय टी महाविद्यालय पुणे आळंदी व रहाता तालुक्यातील परिसरातून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होऊन भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here