पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत संपन्न

शिष्यवृत्ती परीक्षा

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) आणि पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली.

 

दरवर्षी शासनाकडून इयत्ता पाचवी आणि आठवी साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. याही वर्षी परीक्षा केंद्र व्ही.पी.एस होते. परीक्षा केंद्रावर इयत्ता पाचवी साठी १९४ तसेच इयत्ता आठवीसाठी ३८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दोन्ही इयत्तेचे मिळून ५७८ विद्यार्थी परीक्षा केंद्रावर प्रविष्ट झाले होते. परीक्षा घेण्यासाठी एकूण २५ ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली होती. शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली.

 

इयत्ता आठवीचे केंद्रसंचालक प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, इयत्ता पाचवी साठी केंद्रसंचालक प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ होते. परीक्षार्थीची संख्या जास्त असल्यामुळे प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ यांची नियुक्ती उपकेंद्रसंचालक म्हणून करण्यात आली होती.

गटशिक्षणाधिकारी वडगाव मावळ श्री. सुदाम वाळंज साहेब यांच्या नियंत्रणाखालील तालुक्यामधील सर्व केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. तालुक्यातील मोजक्या दोन-तीन मोठ्या परीक्षा केंद्रापैकी व्ही.पी.एस केंद्र सर्वात मोठे असल्याकारणाने सर्व प्रशासनाचे लक्ष सदर केंद्राकडे होते. शासनातर्फे पंचायत समिती वडगाव मावळचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. नानाभाऊ शेळकंदे साहेब यांनी केंद्राला भेट दिली. परीक्षा केंद्राचे नियोजन पाहून त्यांनी शाळा प्रशासन आणि नियोजन कर्त्यांचे कौतुक केले.

परीक्षेचे नियोजन प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात झाले. परीक्षा पार पाडण्यासाठी समिती प्रमुख श्री. मोहनराव ढाणे यांनी नियोजन केले होते. श्री. संजय पालवे, श्री. दत्तात्रय सुरवसे, श्री. विठ्ठल खेडकर, श्री. वैभव सूर्यवंशी, श्री. शिवकुमार दहिफळे, श्री. महेश चोणगे, श्री. कुंडलिक आंबेकर, श्री. रवी दंडगव्हाळ, श्री. विक्रम शिंदे, श्री. सचिन थोरात, श्री. निलेश ढाकोळ, श्री. संजय राऊत त्याचबरोबर प्रशालेतील शिक्षक आणि सेवक यांचे सहकार्य लाभले.

परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी संख्या पाहता लोणावळा शहर पोलीस स्थानकातर्फे एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती परीक्षा केंद्रावर करण्यात आली होती. त्याचबरोबर लोणावळा आरोग्य विभागातर्फे आरोग्य परिचारिका नियुक्त करण्यात आल्या होत्या.शासनाकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेचे नियोजन व्यवस्थित करून परीक्षा सुरळीत पार पाडल्यामुळे नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी प्रशालेचे पदाधिकारी आणि नियोजन करणाऱ्या टीमचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here