पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : सामाजिक बांधिलकी म्हणून खाकी वर्दी स्वीकारलेले एक अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे सुनील फुलारी होय. तर हे आहेत आपल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनीलजी फुलारी. २०२५ सालच्या २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक यांना जाहीर करून गौरवण्यात आले आहे. त्याच दिवशी लगेच यांना अभिनंदन पर थोडक्यात का होईना शुभेच्छा दिल्या आहेतच.
नंतर माहिती घेतली तर समजले की ही व्यक्ती छोट्या अभिनंदनच नाही तर खूप मोठ्या अभिनंदन व कौतुकास पात्र आहे. कारण हे राष्ट्रपती पदक त्यांचे दुसरे आहे यापूर्वी देखील त्यांना गुणवत्तेबद्दल २०१३ साली पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. मग लगेच ठरविले की यांचे सर्व पैलू जनतेसमोर आले पाहिजेत की जेणेकरून आणखी काही जणांना त्यापासून नक्कीच प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल असे मनाशी ठरवून लेख लिहायचे ठरविले. मा. सुनील जी फुलारी हे मूळचे नागपूरचे असून १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये गडचिरोली चंद्रपूर यासारख्या नक्षलवादी क्षेत्रामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर सारख्या मोठ्या शहरात उपराजधानी मध्ये देखील बऱ्याच सामूहिक गुन्हेगारी जगतातील टोळ्यावरती अंकुश लावण्यासाठी प्रसंगी मोका, एम पी डी ए अंतर्गत कारवाया करून नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या संख्येमध्ये घट झाली आहे.
२०२० च्या कोरोना काळामध्ये सुद्धा माणुसकी व सामाजिक बांधिलकी जपत पोलीस हा समाजापासून वेगळा नसतो असा सुखद अनुभव जनतेला दिलेला आहे. मा. सुनील जी यांनी कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड या ठिकाणच्या जातीय संघर्षामध्ये आणि मराठा आंदोलनामध्ये देखील प्रसंगी कणखर भूमिका घेऊन सलोखा सांभाळण्यात कसर सोडली नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता परिस्थिती उत्तमरीत्या यशस्वीपणे हाताळली आहे. नागपूर जळगाव सांगली पुणे येथे गंभीर व गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यामध्येही त्यांचे तपासाचे कौशल्य दिसून येते. मोहल्ला समिती शांतता समिती अशा माध्यमातून व्यवस्थित परिस्थिती हाताळून सलोखा सांभाळण्यात देखील यश मिळविले आहे आणि कोणत्याही प्रकारे वातावरण बिघडू दिले नाही.
कोल्हापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती असल्याने आंतरराज्य गुन्हेगारी वरती लक्ष ठेवणे हे देखील एक वेगळेच काम असते. लोकसभा विधानसभा या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी उत्तम नियोजन केले. चांगल्या पद्धतीने उपाययोजना राबवल्या. पोलिसाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. पोलीस हे देखील आपल्याच या समाजाचे एक भाग असतात असा विश्वास निर्माण केला.
अल्पसंख्यांक समाजाचे पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन गणपती ईद हे सण शांततेत कसे पार पडतील याबाबत प्रबोधन केले. नवरात्र भीमा कोरेगाव वारी बंदोबस्त निवडणुका सततचा व्हीआयपी बंदोबस्त दौरे यामुळे पोलिसांवर येणारा ताण याचेही अनुभव शिदोरीत बांधून घेतले आहेत. त्यामधून बरेच काही शिकायला मिळते अशी त्यांची भावना आहे. वन्यजीव प्राणी गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी तस्करीमध्ये व्हेल माशा उलटीची तस्करी यावर नियंत्रण मिळवताना ४५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये मालमत्ता शरीराबाबतचे गुन्हे आर्थिक गुन्हे याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोलिंग रस्ता नाकाबंदी रात्रगस्ती पथके अशा मार्गाने नियंत्रण मिळवले त्यामुळे गुन्ह्यामध्ये बऱ्यापैकी घट झाली.







