महात्मा फुले आणि इस्लाम पुस्तकाचे प्रकाशन

महात्मा फुले आणि इस्लाम

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साधारणत १४०० वर्षांपूर्वी अरबस्तानात पैगंबरांनी (स.) जी आदर्श सर्वांगीण क्रांति घडवली होती, त्या क्रांतिने अवघ्या जगातील समाज सुधारकांना आश्चर्य चकित केले. स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय प्रस्थापित झालेला लोकांनी डोळ्यांनी पाहिले, प्रत्यक्ष अनुभवला म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुध्दा पैगंबरांच गुणगाण करणारा जहांमर्द मुहम्मद (स.) हा पहिला पोवाडा लिहिला. तद्वतच एकोणीसाव्या शतकातील महात्मा ज्यतिराव फुलेंच्या कार्यात अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले. तन-मन धनाने फुले दांपत्याला सर्वतोपरी सहकार्य केले. फुले दांपत्याला पडत्या काळात मोलाची साथ देणा-यांमध्ये उस्मान शेख, त्यांची बहीण फातेमाबी शेख व मुन्शी गफ्फार बेग यांचा सिंहाचा वाटा आहे.

महात्मा फुले आणि इस्लामम हा अ. कादर मुकादम साहेबांचा लेख मुकाद या संबंधी खूप महत्वाचा असून तो महाराष्ट्र शासनानेही मशोधांच्या नव्या वाटाफ या हरि नरकेंनी संकलीत केलेल्या ग्रंथात प्रकाशीत केला आहे. म्हणूनच मसावित्री फातेमा सद्भावना मंचफ तर्फे तो पुस्तिकेच्या स्वरूपात जनसामान्यांसाठी प्रकाशित करत आहोत. असे प्रतिपादन सावित्री फातेमा सद्भावना मंचाचे अध्यक्ष ॲड. संभाजी बोरुडे यांनी केले.

सावित्री फातेमा सद्भावना मंचाच्यावतीने फुले आणि विचार महात्मा इस्लाम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष एडवोकेट संभाजी बोरुडे, डॉ. रफिक सय्यद, संजय झिंजे, अशोक सब्बन, राजु भाई शेख, अब्दुल रहीम साहब, बापू चंदनशिवे, मुबीन खान आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here