डोंगर भागातील पक्ष्यांना धान्य व पाण्याची सोय करणार – अमित जगताप

अमित जगताप

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : तिर्थक्षेत्र रामदरा नागेश्वर महादेव मंदीर डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा वावर आहे गेल्या काही दिवसापूर्वीच संपूर्ण डोंगर परिसर वणव्याचा तांडव सुरु होता तो विझवण्यासाठी वनविभाग लोणी का‌ळभोर, तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांना यश आले आहे.

 

ग्रीन फाउंडेशन च्या वतीने पाणवठा बांधण्यात आला आहे त्या ठिकाणी डोंगर परिसरातील बहुतांश प्राणी पक्षी यांची तहान पाणवठा भागवत होता पण पाणवठ्या कडे जाणारी पाईप लाईन वणव्यात जळुन खाक झाली आहे ती परत नवीन बसण्यास प्रयत्न ग्रीन फाउंडेशन करणार आहे.त्याच प्रमाणे दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पक्ष्यांना धान्य व पाणी उपक्रम शिवभक्त मुरलीधर गुजर यांच्या हस्ते सुरु करण्यात आला आहे.

 

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांसह पशू-पक्ष्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा तापमानात आकाशात उडान करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ते कोसळु लागले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्यामुळे आवारात, रस्त्यावर पडलेले दिसतात.

 

लोणी काळभोर मधील पक्षीप्रेमींना उन्हाळ्याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असून, पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या खिडकीत, गच्चीवर पाणी, धान्य ठेवण्याचे आवाहन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले. या वेळी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रतिक कोळपे, ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्षा योगिताताई घुले तसेच ग्रीन फाउंडेशन सभासद बिरुदेव भास्कर, विशाल लष्कर, नितीन काळभोर, विनोद यादव, करण भोसले,सिद्धार्थ खंडागळे,बाबासाहेब घोडके उपस्थित होते.

 

वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे माणसांना नकोसे होत असतानाच अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था ही बिकट होऊ लागली आहे. ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून दर रविवारी पक्ष्यांना धान्य व पाणी याची सोय करण्यात येणार आहे २०० हुन अधिक धान्य चे डब्बे लावण्यात येणार आहेत.या नाविन्यपूर्ण उपक्रमात सर्व लोणी काळभोर व कदम वाकवस्ती ग्रामस्थ सहभागी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here