नवी दिल्ली (विशेष प्रतिनधी उपसंपादक मीरा आरेकर) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. विज्ञान भवनात संमेलनाचे उद्घाटन झालं आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. तसेच राज्यातील साहित्यिक या सोहळ्यास उपस्थित आहेत.
#WATCH | Delhi: During the inauguration of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, Prime Minister Narendra Modi says "There has never been any animosity among Indian languages. Languages have always influenced and enriched each other. Often, when efforts are made to… pic.twitter.com/aZ1IKmygu4
— ANI (@ANI) February 21, 2025
भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नाही. भाषांनी नेहमीच एकमेकांवर प्रभाव टाकला आहे आणि समृद्ध केले आहे.अनेकदा, जेव्हा भाषेच्या आधारावर विभागणी करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आपला सामायिक भाषिक वारसा जोरदार प्रतिवाद प्रदान करतो. या सर्व समाजाशी दुरावण्याची आणि समृद्धीची जबाबदारी स्वीकारण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळेच आज आपण मराठीसह सर्व प्रमुख भाषांमध्ये शिक्षणाचा प्रसार करत आहोत, ही मानसिकता मराठीच्या कमतरतेमुळे बदलली आहे. देशात साहित्याला खूप महत्त्व आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी म्हणाले.
भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. मराठीत शूरता आणि वीरता देखील आहे. मराठी सौंदर्य आहे आणि संवेदना आहे. समानता आहे आणि समरस्ता देखील आहे. आध्यात्मताचे स्वर देखील आहेत आणि आधुनिकतेचे स्वर देखील आहेत. जेव्हा भारताला आध्यात्मिकतेची गरज होती तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संतांनी समाजाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
राजकारण-साहित्य एकमेकांना पूरक – शरद पवार
मराठी संमेलनाशी राजकारण्यांचा संबंध काय, अशी चर्चा सातत्याने केली जाते. पण, या वादाला काहीही अर्थ नाही. राजकारण व साहित्य दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला पाहिजे, असे स्पष्ट मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले.
New Delhi: NCP (SP) chief Sharad Pawar addresses the inauguration ceremony of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan pic.twitter.com/46qesn0Feu
— IANS (@ians_india) February 21, 2025
राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर प्रवाह दुतर्फा असतो. लोकमान्य टिळक, पं. नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण या राजकारण्यांनी साहित्याला प्रतिष्ठा दिली. ही उदाहरणे पाहिली तर साहित्याला राजाश्रय लाभलेला नाही तर, राजाने साहित्य कला जोपासली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या लेखणीला देखील तलवारीसारखी धार होती. राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही. हे दोघे परस्परांना पूरक ठरतात, असे पवार म्हणाले.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi to shortly inaugurate 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan.
Maharashtra CM Devendra Fadnavis also present.
(Source: DD News) pic.twitter.com/oCS173ELpx
— ANI (@ANI) February 21, 2025
या संमेलनासाठी साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे मोदी दुसरे पंतप्रधान आहेत.







