जळगाव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राजेंद्र महाजन) : एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना गुजरात राज्यातुन बायोडिझल भरलेले दोन टॅँकर हे जळगाव मधून माहामार्गाने जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
ही गोपनिय माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप गावीत, यांना दिल्याने त्यांनी पथक तयार करून कारवाई करणे कामी मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पोसई चंद्रकात धनके, अशोक काळे, विकास सादिवे, शशिकांत मराठे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, पोकों डापकर यांचे पथक तयार करुन जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वर ईच्छादेवी ते अजिंठा चौक येथे रात्रीवेळी गुप्त पाळत ठेवली असता, सदर पथकास रात्रीवेळी अजिंठा चौकात ०२ टैंकर क्रं. GJ-१२/BT-४२८४ व क्रं. GJ-१२/BT-११८१ हे मिळून आले. सदर टैंकर चालक व क्लिनर यांचेकडे चौकशी करता, त्यांनी सदर टेंकर मध्ये बायोडिझेल असल्याची माहिती देवून, कोणताही बायोडिझेल वाहतुकीचा परवाना नसल्याबाबत माहिती दिली.
त्यामुळे दोन्ही टंकर हे पोलीस स्टेशनला आणून हजर केले. सदर दोन्ही टेंकर मधील बायोडिझल बाबत इंडियन ऑईल, जळगाव व सर्वोदय सव्हिस स्टेशन, जळगाव यांचे तज्ञांकडून तपासणी करुन घेण्यात आली असता, त्यांनी सदर टैंकरमधील द्रव हा बायोडिझेल असल्याबाबत खात्रीशिर माहिती दिली. दोन टँकर मधील बायडीजल 27 लाख रुपयाचे तर दोन टँकर असे एकूण ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही गुन्हयात टेंकर चालक व क्लिनर सद्याम सैयद अकबर (वय-२३ रा. बच्छाव, गुजरात) ,क्लिनर सुलेमान इलीयास छेरेया (रा. बरसाना कच्छ राज्य गुजरात) ,चालक लतीफ भाई फकिर हिंगोरजा (रा. कच्छ गुजरात) ,क्लिनर ज्ञानेश्वर भारत शिजुळ (वय-२१ रा. मेहकर ता.जि. बुलढाणा) यांचे विरुध्द अत्यावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ चे कलम ३ व ७ सह भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८९, १२५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे., चालक व क्लिनर यांना अटक केले आहेत. सदर दोन्ही गुन्हयाचा तपास संदिप पाटील पोलीस निरीक्षक, तसेच पोहेको राजेंद्र कांडेकर व पोहेको रविंद्र परदेशी असे करीत आहेत.







