पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई

गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय गुन्ह बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक पांढरे बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर मार्गे टेंभुर्णीकडे जात असल्याची गोपनीय बातमी मिळालेने पंढरपुर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हददीतील सांगोला रोडवरील विक्रम ढाबा समोर सापळा लावला.

 

रात्रौ ०९/३० वा चे सुमारास बातमीतील वर्णनाचा मालवाहतुक पिकअप हा विक्रम ढाब्यासमोर रोडवर आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवुन पिकअप चालकाकडे पिकअप मधील मालाबाबत विचारणा केली असता पिकअप चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला, आर. एम. डी पानमसाला व एम सुगंधित तंबाखु असलेचे सांगीतलेने सदरचा पिकअप नं एम.एच-१० डीटी ४५१७ व त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटखा तसेच पिकअप चे चालकास ताब्यात घेवुन सदरचा मु‌द्देमाल पोलीस ठाणेस आणुन अन्न व औषध प्रशासन यांचेशी संपर्क करून पुढील कार्यवाही करीत आहे.

 

जप्त करणेत पिकअप व प्रतिबंधीत केलेला गुटखा एकुण मुद्देमाल ६,००,०००/- रू. अंदाजे किंमतीचा विमल कंपनीचा पान मसाला २५ पोती, १,९८,०००/- रू. अंदाजे किंमतीचा किंग पॅक विमल कंपनीचा पान मसाला ०५ पोती, ६०,०००/- रू. अंदाजे किंमतीची एम कंपनीची सुगंधित तंबाखु :- १०० बॉक्स, ९०,०००/- रू. अंदाजे किंमतीचा आर. एम. डी कंपनीचा पान मसाला-१०० बॉक्स, १,५०,०००/- रू. अंदाजे किंमतीची व्ही १ कंपनीची सुगंधित तंबाखु :- ०५ पोती, २२,०००/- रू. अंदाने किंमतीची व्ही १ कंपनीची सुगंधित तंबाखु :- ०१ पोते, ८,००,०००/- रू किं एक महिंद्रा कंपनीचा बोलेरा पिकअप नं एम. एच-१० डीटी ४५१७ असा एकुण १९ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल चालकासह ताब्यात घेतला.

 

सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, डॉ. अर्जुन भोसले साो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर। पोलीस ठाणे विश्वजीत घोडके , यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे, श्रेणी. पोसई राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, कल्याण ढवणे, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी,पोलीस नाईक सचिन इंगळे, पोकॉ शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे, तुकाराम व्हरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here