साईसेवा मतिमंद विद्यालयाची एक दिवसीय सहल उत्साहात पार

साईसेवा मतिमंद

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त साईसेवा निवासी मतिमंद मुला- मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थ्यांची सहल अगत्य कृषी पर्यटन केंद्र सावळीविहीर ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे आयोजन करण्यात आले.

 

या सहलीसाठी अगत्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री सुनील चंद्रकांत कुलकर्णी, श्री संजय चंद्रकांत कुलकर्णी व श्री चैतन्य सुनील कुलकर्णी यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतापासून ते निरोप समारंभापर्यंत विद्यार्थ्यांची परिपूर्ण काळजी घेतली. तसेच श्री वैभव बाळासाहेब जावळे व सर्व कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे विशेष काळजी घेतली विद्यार्थ्यांसाठी कोणतीच कमतरता भासून दिली नाही.

 

विशेष म्हणजे येथील सर्व कर्मचारी वर्गाने या विद्यार्थ्यांसोबत मनमुराद आनंद घेतला. हे पाहून अगत्त्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक भारावून गेले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना येथे दरवर्षी येण्याचे निमंत्रण दिले. या एक दिवसीय सहलीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद खूप मौल्यवान ठरला. या सहलीद्वारे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचीच नव्हे; तर जीवनातील विविध अनुभवांची आणि समाजातील विविध बाबींची माहिती मिळण्यास मदत झाली.

 

विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळून संपर्क साधता आला. तसेच वॉटर पार्क, बोटिंग, विविध पक्षी पाहणे यासारख्या विविध प्रकारांनी विद्यार्थ्यांना एक अद्भुत अनुभव मिळाला. तसेच या वातावरणामुळे विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संबंध दृढ झाला.
या सहलीसाठी विद्यालयातील मुख्याध्यापिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले व स्वतःही आनंद लुटला. तसेच अगत्य पर्यटन केंद्राचे संचालक श्री चैतन्यदादा कुलकर्णी यांना साईबाबा शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानून सांगता करण्यात आली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here