सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत खटाव पंचायत समितीचे तज्ञ मार्गदर्शक गणेश पवार यांनी सादर केलेल्या थिमची किमया न्यारी, मुले इंग्रजी मध्ये लय भारीया उपक्रमास राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळाला.
नुकताच त्यांचा पुणे येथे संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहसंचालक अनुराधा ओक, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे उपस्थित होते. हे पारितोषिक त्यांना विषय तज्ञ गटातून मिळाले आहे.पूर्व प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी यासाठी गणेश पवार यांनी या नवोपक्रमचे राज्यस्तरावर सादरीकरण केले होते. गणेश पवार हे वडूज पंचायत समिती मध्ये कार्यरत असून तालुकास्तरीय विविध प्रशिक्षणे, उपक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
या यशाबद्दल त्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, डायट प्राचार्य डॉ अमोल डोंबाळे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, प्रतिभा भराडे अधिव्याख्याते कृष्णा फडतरे, विजयकुमार कोकरे अन्नपूर्णा माळी डॉ सतीश फरांदे विजय भिसे शिक्षण विस्ताराधिकारी संगिता गायकवाड चंद्रकांत सुतार, सौ अनिता पवार खटाव तालुक्यातील इंग्रजी विषयचे तज्ञ मार्गदर्शक रविंद्र पवार, विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.







