हिंदी मराठी पत्रकार संघ ( राष्ट्रीय) अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी आण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती

आण्णासाहेब बनसोडे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : हिंदी मराठी पत्रकार संघ ( राष्ट्रीय) ही संघटना थोर महापुरुषांच्या विचारावर चालणारी संघटना आहे सदर संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी श्री आण्णासाहेब बनसोडे (वार्ताहार प्रतिनिधी ) यांची नियुक्ती धनश्रीताई काटीकर पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

 

 

या निवडीचे सर्व स्तरावरून पत्रकार वाचक नागरिक यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. सदर संघटना ही अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदी मराठी संघ काम करते. दैनिक साप्ताहिक ‘ साय दैनिक प्रिंट मीडिया ’ टीव्ही चॅनेल, न्यूज पोर्टल व इतर सर्व माध्यमातील संपादक पत्रकार, निवेदक, प्रेस फोटोग्राफर, प्रेस कर्मचारी, पेपर वितरक, यांच्या समस्या व अन्याय, अत्याचार विरोधी आवाज उठवणे, शेतकरी, कामगार, महिलांचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, रोजगार व विविध योजना विषयी मार्गदर्शन, महिला सबलीकरण, दिव्यांगाना मदत करणे, शासनाच्या विविध योजना गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचवणे असे विविध विषय घेऊन पुढील वाटचाल सुरू आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here