पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) : शहरात अनेक दिवसांपासून स्वर्ग रथाची आवश्यकता आहे म्हणून सर्वच जण चर्चा करित होते परंतु यासाठी कोणी पुढे येऊन निर्णय घेत नव्हता. या अति आवश्यक गोष्टी साठी शेवटी शहरातील आरोग्य दुत डॉ योगेंद्र पवार यांनी पुढाकार घेत ते पुढे आले.
त्यांनी सोशल मीडियावर याबाबत चर्चा केली कि आपल्या पारोळा शहरात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यासाठी स्वर्ग रथ नाही म्हणून इतर ठिकाणच्या स्वर्गरथावर अवलंबून राहावे लागते म्हणून आपल्या शहरात देखील स्वर्गरथ असला पाहिजे हा स्वर्गरथ लोकसहभागातून लोकवर्गणीतून उभा राहावा म्हणून त्यांनी सोशल मीडिया वर चर्चा घडवून आणली त्यातूनच त्यांना अनेकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अनेकांनी या पुण्य कामासाठी सहकार्य करण्याचे सांगितले म्हणूनच जणतेचे जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी डॉ योगेंद्र पवार यांनी स्वर्गरथ पारोळा म्हणून एका गृप ची निर्मिती केली या गृप मध्ये शहरासह तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक व्यापारी यांनी सहभाग घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे यासंदर्भात दि २४ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक मिंटिग चे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी स्वर्ग रथाची संपूर्ण माहिती सर्वांसमोर आणली जाईल तसेच यासाठी किती खर्च अपेक्षित आहे तसेच पुढील देखभाल ड्रायव्हर खर्च या सह इतर गोष्टी साठी विचार विमर्श केला जाणार असल्याचे सांगण्यात आले म्हणून या मुलभूत गरजेसाठी सर्वांनी उपस्थित राहुन जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल यावर आपले मनोगत व्यक्त करावे. तसेच या पुण्यकार्यास जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी पुढे येत सहकार्य करावे असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे.







