सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : ग्रामसभा, सरकारी योजनांची माहिती मिळण्याबरोबरच चोरी,दरोड्यासारख्या संकटकालीन स्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे आपदग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यास मदत होणार असल्याचे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या प्रयत्नातून ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत केली जात आहे. जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषदेच्यावतीने ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत आज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी तहसिलदार बाई माने ,पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,स.पो नी शिंदे, चंदनशिवे, ग्राम सुरक्षाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी अजय भोसले,पुष्कर जाधव,कुंडलिक कटरे,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री.गोर्डे म्हणाले, पोलीस ठाण्याच्या हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या 18002703600/9822112281 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. तसेच त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जात असल्याने परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्राम सुरक्षेची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक कुटूंबाला वर्षाला 50 रुपये खर्च येणार आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून याबाबत खर्चाची तरतूद करण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिले आहेत. श्री.गोर्डे यांनी याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणाचे महत्त्व पटवून दिले.ग्राम सुरक्षा यंत्रणाच्या माध्यमातून सकट मोचानाचे काम होतं असल्याचे त्यांनी सांगितले.आपत्कालीन परिस्थितीत जेथे लवकर पोहचू शकत नाही तिथे ही यंत्रणा पोहचते.त्यामुळे घडणाऱ्या घटना टाळल्या आहेत .ही यंत्रणा प्रत्येकांच्या घरो घरों पोहचने गरजेचे आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार बाई माने यांनी गावाच्या सुरक्षेसाठी इतकी चांगली यंत्रणा पोहचते आहे. यामुळे एकादी घटना टाळल्या जाऊ शकते . यासाठी गावे ॲक्टिव करावीत गावाच्या भल्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी गावोगावच्या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समित्यांचे अध्यक्ष,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.







