शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली तसेच विद्यालयातील एका विद्यार्थ्याला बाल शिवाजी करून पूजन करण्यात आले.
विद्यालयातील सर्व कर्मचारी विद्यार्थी यांच्याकडून मुजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहभागाने यशस्वी झाला.







