पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : जय हिंद महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या मोनिका वासवानी यांच्या हस्ते शिवरायांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्या बिंदू जोस, पर्यवेक्षिका सुनिता महारा, पर्यवेक्षिका सौ लिंजा मॅडम, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक धनंजय ठोके उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्राध्यापक राजेंद्र कदम, प्राध्यापक अशोक रुपनर, प्राध्यापक किरण घाटबांधे, प्राध्यापक भालचंद्र पवार, प्राध्यापक ए बी चोको, सौ मीनाक्षी पाटील, सौ कीर्ती गुलेरिया, सौ निशा मॅडम, सौ शामल मॅडम, सौ याज्ञिका शिंदे, सौ करिष्मा शिंदे, सौ वर्षा मॅडम, सौ प्रतीक्षा भाकरे, सौ सविता मॅडम, सौ रीना सेवलानी मॅडम, प्राध्यापक दीपक महाजन, प्राध्यापक मराठे सर, प्राध्यापक चंद्रकांत पाटील सर उपस्थित होते. पारंपारिक वेशभूषेमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीम व लाठीकाठीचे प्रदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
शिववंदनेने कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘शपथ हिंदवी स्वराज्याची’ हा पोवाडा सादर केला. तृप्ती थिटांबे हिने उत्कृष्ट भाषण सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. विनया आणि ग्रुप, श्रावणी आणि ग्रुप, प्रेम आणि ग्रुप, आदिती आणि ग्रुप यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्यानंतर स्वाती मुरूमकर हिने पोवाडा सादर केला. त्यानंतर साक्षी डिकुंदवार व ग्रुप यांनी शिवाजी महाराजांवर नाटक सादर केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुमार प्रेम यादव, राज देशमुख, शर्वरी कोंढाळकर, लावण्या भागवत, सिद्धी बोरा, श्रेया ढोले, रुजूला अटपाडकर, प्रथम श्रीवास्तव, अराफत जमादार, स्नेहा सुगावे, श्लोका शिंदे, शुभम घोलप, वैष्णवी थोरात या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मृणाल सुपे व कुमार स्वप्निल भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक धनंजय ठोके यांनी केले. शिवगर्जनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







