मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. घरासमोर महिला आणि त्यांचा लहान मुलगा झोपला होता. मात्र, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दोघांना चिरडले. चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, जखमी महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डाळा परिसरातील राम मंदिर बाळाराम खेडेकर मार्गावरील घडली आहे. घरासमोर महिला आणि तिचा लहान मुलगा झोपला होता. यादरम्यान, चाराचाकी भरधाव वेगाने आली. कार चालक नशेत धुंद होता. त्याने चारचाकी वाहन महिला आणि चिमुकल्याच्या अंगावरून नेली. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, महिला गंभीर जखमी आहे.
महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची चौकशी केली. आरोपीविरोधात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







