जळगाव (संपादक सुनिल पाटील) : येथील जेष्ठ नागरिक संघामध्ये रविवारी (दि.२३) योगा व प्राणायम या विषयावर शहरातील अध्यात्मिक व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.के.के. भोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना डॉ.के.के. भोळे योग, योगाचे प्रकार, प्राणायमाचे प्रकार, आसनांचे प्रकार, ध्यान, ध्यानाचे प्रकार, मुद्रा, प्राणायमाचे आठ प्रकार यावर प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्षस्थानी फेस्कानचे अध्यक्ष डी.टी.चौधरी, संघाचे सचिव विकास बोरोले, श्री.पाटील, आनंदाश्रमचे अध्यक्ष श्री.खटोड व्यासपीठावर उपस्थित होते. संघाचे कार्यकारिणीचे विश्वास सोनवणे, दिनेश पाटील, कोषाध्यक्ष के.डी.पाटील, दिलीप बोरसे, उमेश पाटील, महिला संघाच्या अध्यक्षा भारती पाटील त्यांची कार्यकारिणी तसेच श्रीमती शशिकला बोरोले यांनी चित्रीकरण केले. पसायदानाने सांगता झाली, असे संघाचे सचिव श्रीनिवास बोरोले यांनी कळविले आहे.







