डेपो मॅनेजरच्या जाचाला कंटाळून पीएमपीएलच्या महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

wife-in-fire

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : शरीर सुखाची मागणी करत डेपो मॅनेजर देत असलेल्या जाचाला कंटाळून पीएमपीएलच्या महिला वाहकाने कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

 

महिला वाहकाने बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर संजय राजाराम कुसाळकर हा त्यांना अनेक वर्षांपासून त्रास देत होता. ड्युटीवर असताना डेपो मॅनेजर वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. कधी अवघड ड्युटी लावणे, उशिरा सुटणाऱ्या गाड्या देणे, इतकेच नाही तर चेहऱ्यावर रुमाल बांधून कुसाळकर हा त्यांचा पाठलाग देखील करायचा. पाठलाग करत थांबवून महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. माझी इच्छा पुर्ण केली तर त्रास होणार नाही. लोडच्या गाड्या करायची गरज नाही, असं डेपो मॅनेजर सांगायचं असं या महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटलंय. मात्र डेपो मॅनेजरविरोधात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. यामुळे महिला कंडक्टरने मॅनेजरच्या कार्यालयात जात अंगावर पेट्रोल टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला.

 

याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, संजय कुसाळकरने यापूर्वीही महिलेला त्रास दिलाय. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पीडितेला त्रास देण्यासाठी डेपो मॅनेजरला एक वाहक आणि चालक मदत करत होता. वाहक सुनील भालेकर याने मानसिक त्रास दिला. भालेकर हा महिलेला फोटो व्हायरल करण्याचा त्रास द्यायचा आणि पाठलाग करायचा. सुधीर राठोड हा कॉल करून शिव्या देत होता.

 

दरम्यान महिला वाहकाने महिला आयोग आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. वरिष्ठांकडेही याप्रकरणी वेळोवेळी तक्रार दाखल केलीय. मात्र त्याची दखल घेत जात नसल्याने मनीषा शेकडे यांनी संजय कुसाळकर यांच्या केबिनमध्ये असलेलं पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पीएमपीएलच्या वरिष्ठांकडे डेपो मॅनेजरविरोधात तक्रार केल्यानंतर मॅनेजरनं महिला कर्मचाऱ्यालाच निलंबित केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here