मराठा समाज आरक्षण : नंदुरबारमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा समाज आरक्षण

नंदुरबार (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी शासनाचा निषेध करत आत्मदहन करण्याच्या प्रयत्न केला आहे. आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा नंदुरबार जिल्ह्यातील आणखीन तीव्र आंदोलन होणार असल्याचा इशारा आंदोलक गुलाब मराठे यांनी दिला आहे.

 

 

तालुक्यातील उमर्दे इथं घडली आहे. गुलाब मराठे असं आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या आंदोलकाचं नाव आहे. गेल्या दीड वर्षापासून मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. त्यासोबतच नंदुरबार येथील आंदोलक गुलाब मराठे देखील जरांगे यांना समर्थन देत आहेत.

 

 

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपूर्वीच आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे हे मराठी समाजाच्या आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. अनेक दिवस त्यांनी उपोषण केले. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे म्हटले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here