शेतात शौचास जाणाऱ्या महिलेला मारहाण

ladies-marhan
File photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : डिंग्रजवाडी (ता.शिरुर) येथील एका शेतात शौचास जाणाऱ्या उसतोड कामगार महिलेला पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप पोपट गव्हाणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील संदीप गव्हाणे यांच्या घराच्या शेजारी दहा दिवसांपासून काही उसतोड कामगार राहत असून, सकाळच्या सुमारास उषाबाई गायकवाड या गव्हाणे यांच्या शेताकडे शौचास जात असताना संदीप गव्हाणे या इसमाने शेताकडे येत ‘तुम्ही शेतात शौचास का येता? तुमच्याकडे बघतोच…’ असे म्हणून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली

 

दरम्यान, महिलेले आरडाओरडा केल्याने शेजारील वयोवृध्द महिला तिला सोडवण्यासाठी आली असता संदीप याने तिला देखील मारहाण केली. याबाबत उषाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय ४० वर्षे सध्या रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप पोपट गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी ता. शिरुर जि. पुणे) या इसमावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here