पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : शिरुर येथील एक महिला न्हावरा येथे उपचारासाठी दाखल असताना हॉस्पिटल मधील डॉक्टरने रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी न्यायालयाने डॉ. रामहरी भुजंगराव लाड याला दोन वर्षे कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील महिला ऑगस्ट २०२० मध्ये न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रात्रीच्या वेळी डॉ. रामहरी लाड यांनी महिलेला तपासणी करण्यासाठी केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची सांगत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला. दरम्यान महिलेने डॉक्टरला ढकलून देत बाहेर आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड (वय ४६ वर्षे रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे) यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी आरोपीबाबत योग्य पुरावे व साक्षीदार न्यायलयात हजर केले असता अखेर जिल्हा सत्र न्यायालय जे. ए. झारी यांनी आरोपी डॉ. रामहरी लाड यास दोन वर्षे कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून माया क्षिरसागर – जाधव यांनी काम पाहिले तर महिला पोलीस अंमलदार एम एस फंड, पी. एस. वाघमारे, पी. एस. वाडेकर तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष कामगिरी बजावली.







