स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण : ७० तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात

दत्तात्रय गाडे

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : पुण्यातील स्वारगेट डेपोत झालेल्या पीडित तरूणीवर लैंगिक अत्याचाराच्या तब्बल ७० तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्याला जेरबंद करण्यात आले.

”माझं चुकलं, मी पापी आहे”. असं म्हणत आरोपी दत्ता गाडेनं पोलीस कोठडीत टाहो फोडला आहे. मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध आले, असा दावा त्याने कोठडीत पोलीसांसमोर केला आहे. या प्रकरणी पोलीस दत्ता गाडेची कसून चौकशी करत आहेत.

दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी काही पथके तयार केली होती. त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू होता. अखेर पोलिसांना यश आले आहे. इतकेच नाहीतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला होता. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलीस ठाण्याशी किंवा १०० क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here