कोल्हापूर येथे बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर अत्याचार

rape
file photo

कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) : लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्वजीत जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीचा ओळखीचा असून, २०१८ पासूनच त्याने तरुणीसोबत गैरकृत्य सुरू केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. दोनवेळा इच्छेविरुद्ध गर्भपातही करायला लावला होता, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

 

दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्ता गाडेने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येसुद्धा असाच प्रकार उघडकीस आल्यामुळे राज्यात आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here