विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द पु मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

शिवजयंती

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द पु मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.राजेशजी मेहता, प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल जाधव, श्रीमती भारती लोखंडे, श्रीमती सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ ॲड. संदीपजी अगरवाल, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी पूजनाने, प्रतिमापूजनाने आणि आरतीने करण्यात आली. जन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी शिवस्तुती गीते, पोवाडा, काव्यवाचन, एकपात्री नाटक, आणि भाषणे सादर केले.

जन्मोत्सवानिमित्त प्रशालेतील राजकुमार पाटील, समीक्षा दळवी, रुद्र शिंदे, विनायक गिड्डे, श्रावणी पवार, प्रज्ञा जाधव, आदिती पोवार, दर्शना पालकर, खुशी धनवडे, श्वेता भदरगे, तनिष्का मांजरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा महिमा सांगण्यासाठी श्री.संजय पालवे आणि श्री जयवंत सिसोदे यांनी मनोगते सादर केली. प्रशालेतील कलाशिक्षक श्री.चंद्रकांत जोशी यांनी विद्यार्थ्यांचे सुंदर बरची पथक बसवले. त्याचबरोबर श्री.श्रीकांत म्हसकर यांनी ढोल पथकाची उत्तम तयारी केली.

कार्यक्रमाचे नियोजन आणि रुपरेषा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमने यांनी केले. प्रशालेचे कलाशिक्षक श्री.महेश चोणगे यांनी फलकावर महाराजांची सुंदर प्रतिमा रेखाटली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती सदस्य श्री.वैभव सूर्यवंशी, श्री.विक्रम शिंदे, श्रीमती वैजयंती जगताप, श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती स्वाती व्हरांबळे, श्रीमती स्नेहलता कांबळे, श्रीमती किरण मस्के, श्रीमती पोटफोडे, श्रीमती साक्षी वाणी यांचे सहकार्य लाभले.

स्टेज सजावट आणि साऊंड व्यवस्थेसाठी श्री.गजानन कदम आणि श्री मुकुंद जगताप, श्री.सिताराम घारे, श्री मयूर पवार आणि सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांचे आभार समिती प्रमुख श्री.धनंजय काळे यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here