दीड महिन्यानंतर अखेर महाकुंभ मेळ्याची सांगता; ७३ देशातील राजकीय नेत्यांबरोबरच ६५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान करत रचला इतिहास

महाकुंभ मेळ्याची सांगता

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची अखेर दीड महिन्यानंतर सांगता होत आहे. या काळात तब्बल ६५ कोटी भाविकांनी इथं पवित्र स्नान केलं. महाशिवरात्रीच्या अंतिम स्नानाच्या पर्वासाठी सकाळी ०८ वाजेपर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्नान करत हा महारेकॉर्ड कायम राखला.

 

७३ देशांच्या राजकीय नेत्यांचा सहभाग…
या कुंभमेळ्यात ७३ देशांच्या राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भुतानचे नरेश नामग्याल वांगचूक यांच्यासह इतर देशांचे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. नेपाळमधून ५० लाखांहून अधिक लोकांनी आजवर त्रिवेणी संगमावर हजेरी लावली. याशिवाय इटली, फ्रान्स, युके, पोर्तुगाल, अमेरिका, इस्राईल, ईरान, मॉरिशस या देशांमधून श्रद्धाळू कुंभमेळ्यात स्नानासाठी आले होते. नाशिकच्या भावी कुंभमेळ्याला शुभेच्छा
– कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक

हा महाकुंभ भाविकांच्या संख्येच्या हिशेबानं ऐतिहासिक ठरला आहे. केवळ कुंभ मेळाच नव्हे तर जगातील कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात आजवर इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकत्र आलेले नाहीत. जितके लोक ४५ दिवसांमध्ये प्रयागराजमध्ये तयार करण्यात आलेल्या एका अस्थायी शहराशी जोडले गेले होते. ही संख्या खरंतर अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा देखील अधिक आहे. यामध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दु्प्पट ही संख्या आहे. पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा अडीज पट जास्त आहे. तसंच रशियाच्या लोकसंख्येपेक्षा चारपट जास्त लोक आत्तापर्यंत कुंभमेळ्यात आले आहेत.

 

 

इतकंच नव्हे तर जपानच्या लोकसंख्येपेक्षा पाच पट जास्त, युकेच्या लोकसंख्येपेक्षा १० पट जास्त आणि फ्रान्सच्या लोकसंख्येपेक्षा १५ पट जास्त इथल्या भाविकांची संख्या होती. ११ फेब्रुवारी रोजी ४५ कोटी भाविकांनी इथं पवित्र स्नान केलं होतं. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी ही संख्या ६० कोटींवर पोहोचली. त्यानंतर महाशिवरात्रीला या एकूण संख्येनं ६५ कोटींचा आकडा पार करत नवा इतिहास रचला.

 

देशाच्या सुमारे अर्ध्या लोकसंख्येनं लावली डुबकी…
प्रयागराज इथं आयोजित महाकुंभ मेळ्यातील भाविकांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी संख्या होती. जगभरातील हिंदू धर्माला मानणाऱ्या लोकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here