पिंपरी चिंचवड येथे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जात प्रमाणपत्राचे शिबिर उत्साहात संपन्न

जात प्रमाणपत्राचे शिबिर

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर दत्त मंदिर ट्रस्ट येथे भटक्या विमुक्त जाती जमातीचे जात प्रमाणपत्रात शिबिराचे जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेप्रमाणे व हवेली उपविभागीय अधिकारी मुळशी मावळ उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड मुळशी तहसीलदार कार्यालय यांनी जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने जात दाखला शिबिराचे आयोजन केले होते

 

 

यावेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात भटक्या जाती जमातीचे सर्व नागरिक सहभागी झाले होते या शिबिरासाठी अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख, सुरेंद्र जाधव मंडल अधिकारी पिंपरी चिंचवड, विष्णू भोसले मंडल अधिकारी थेरगाव, ग्राम महसूल अधिकारी कविता पाठक (रहाटणी) सोनाली वांजळे (निगडी) रवी मोहरुत (किवळे) अशोक अमोड(रावेत) साहेबराव थोरात (ताथवडे) अमोल ढिंगाळे, स्वप्निल नरखीडकर (पुनावळे) नवनाथ मूर्ह (जांभे) हनुमंत चांदेकर (थेरगाव) रासने मॅडम पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालय वरील सर्व महसूल ग्राम अधिकारी शिबिरासाठी उपस्थित होते

 

यावेळेस संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी संस्थेविषयी संपूर्ण माहिती देऊन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या विकासासाठी शासन या संस्थेच्या माध्यमातून पुढे आले आहे यामुळे समाज बांधवांनी फायदा घेणे गरजेचे आहे यावेळी अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख साहेब यांनी आगामी काळात या समाजाचे पूर्ण पुनर्वसन करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतो मुदत करणार असल्याचे सांगितले यावेळी या कार्यक्रमासाठी संजय भोसले दीपक कुमावत धनंजय माळवे दिनेश गवळी गोविंदराव अटक महेश हादवे सर्व मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here