श्री साई सेवा पालखीचे शिर्डीत स्वागत

श्री साई सेवा पालखी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : गोडोली सातारा येथील श्री साई सेवा पालखी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिर्डी येथे आली होती. ही पालखी गेल्या २५ वर्षापासून शिर्डी येथे श्री बाळासाहेब जाधव व सौ.सुनंदाताई जाधव यांच्याकडे येत असते या पालखीचे चालक श्री शंकरराव शिंदे सर हि पालखी घेऊन शिडी येथे येत असतात.

या पालखीचे स्वागत बाळासाहेब जाधव व त्यांचा परिवार हे अविरतपणे गेल्या २५ वर्षापासून करीत आहेत याही वर्षी ही पालखी जाधव परिवाराकडे हॉटेल अभिषेक येथे आली होती.साई भक्तांची सेवा केल्याने आत्मिक समाधान मिळते,उर्जा मिळते आणि साक्षात साईबाबा आपल्या भक्तांची करवून घेत असतात आपण मात्र निमित्त असतो,या पालखी पदयात्रींची सेवा करण्याचे भाग्य आम्हा जाधव व शेळके परिवाराला मिळते हे आमचे मोठ भाग्य आहे. भक्त जी जी सेवा कल्पिती । संत स्वयेंचि करवूनि घेती । भक्त केवळ कारण निमित्तीं । सकळ स्फूर्ति संतांची (साई सतचरित्र अध्याय-२ ओवी.१९ ), अशी प्रतिक्रिया सौ.सुनंदाताई जाधव यांनी यावेळी व्यक्त केली .

या पालखीचे हॉटेल अभिषेक येथे स्वागत करण्यात आले व उपस्थित पालखी पर्यटन दरवाजा कार्यक्रम करण्यात आला आहे यावेळी या पालखीचे चालक श्री शंकराव शिंदे यांनी सांगितले की गेल्या २५ वर्षापासून जाधव व शेळके परिवार आमची सेवा करीत आहेत यावेळी शिर्डीचे नगरसेवक नितीन शेळके, अक्षय शेळके, जयताई शेळके, गौरीताई शेळके, सीमाताई तुरकणे, सविताताई तुरकणे ,मंगलताई कदम,बाळासाहेब नाईकवाडे , रवींद्र सोनवणे,पुष्कर शेळके, महेंद्र काळे,मुस्ताक सय्यद आदींसह हॉटेल अभिषेक सर्व कर्मचारी वृंद व पदयात्री मोठया संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here