पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : सोनके विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील तसेच व्हा. चेअरमनपदी धोंडीबा थोरात यांची बिनविरोध निवड २५ फेब्रुवारी रोजी सोनके ता.पंढरपूर येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जमादार यांनी काम पाहिले.
निवडीदरम्यान पंढरपूर- मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक, व्हा. चेअरमन भारत कोळेकर, विद्यमान संचालक तथा मा. सो. चेअरमन हरिदास थोरात, मधुकर हाके, संचालक पै. धनाजी खरात, दगडू हाके,उपसरपंच तथा उद्योगपती बाबासाहेब हाके, मा. सरपंच दशरथ थोरात, मा. सरपंच मल्हारी खरात, मा. मुख्याध्यापक वासुदेव पाटील, माजी सरपंच दत्ता खरात, मा. सरपंच बाबू कोळेकर, आप्पासाहेब कोळेकर, भीमराव महानवर,पाटलु पाटील, वि. से. सो चेअरमन सिताराम कोळेकर, अर्जुन खरात, हनुमंत खरात, पोलीस पाटील आबा पगारे, कॉन्ट्रॅक्टर महेश येडगे, सरपंच अमोल देवकते, दादा देवकते, दत्तात्रय बंडगर, रत्नाकर शेळके, महादेव शिंदे, हरे कृष्णा ज्वेलर्सचे सत्यावान पाटील,रामचंद्र मेटकरी सर, सतीश पडळकर, भारत हिरा कोळेकर, श्रीमंत बंडलकर, नंदू थोरात, सोसायटी सचिव अमोल मोहळकर,सदस्य नवनाथ खरात,पांडुरंग माने, प्रमोद बंडगर, हनुमंत मेटकरी, सचिन पाटील आधीसह सोनके ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







