सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मोठे वाघोदा येथे अवैधरित्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोरक्षकांना माहिती मिळाल्याने गोवंशाची सुटका करण्याकरता गोरक्षकांनी या गाडी ला थांबवण्याचा प्रयत्न केला असता मोठे वाघोद्यातील काही समाजाच्या लोकांनी या गाडीवाल्याला अभय देत गोरक्षकांवर तुफान दगडफेक करून त्यांना मारहाण केली.
यामुळे संतप्त झालेल्या गोरक्षकांचं वाघोदा सावदा चिनावल येथील अनेक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा त्यांना टक्करा यासाठी सुमारे दोन तास बुरहानपुर अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदा येथे रास्ता रोको केला यावेळी झालेल्या बाचाबाचीत वाघोदा येथील पोलीस पाटील यांनासुद्धा मारहाण करण्यात आली.
वाघोदा निंबोरा चिनावल सावदा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास पणे अवैध गोवंश वाहतूक तसेच त्यांची कत्तल होत आहे याला पाय बंद घालण्यासाठी परिसरातील गोरक्षकांनी गोवंश वाहतूक व परिसरातील कत्तलखाने बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यातच आज अवधरीत्या वंश वाहतुकीची गोरक्षकांना माहिती मिळाल्याने त्यांनी सदर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाघोदा येथे गोरक्षकांवरच हल्ला करण्यात आल्याने वाघोदा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पवन दाजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री योगेश भंगाळे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या ना तात्काळ अटक करा परिसरातील अवैध गोवंश वाहतूक बंद करा याबाबतची मागणी पोलीस प्रशासनाकडे दिली असून सदर प्रकार एक महिन्याच्या आत बंद न झाल्यास पुन्हा रोस्तो रोको करण्यात येईल असे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी गो रक्षकांना आश्वासन दिले. महाराजांनी गो रक्षकांना आश्वासन दिल्यांतर रस्ता मोकळा झाला.







