पत्रकारांना अपमानित करणाऱ्या तहसीलदार विरोधात पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक; जिल्हाधिकारी यांना निवेदन

पत्रकार सुरक्षा समिती

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा म्हणून पत्रकारांना पाहिलं जातंय समाजातील घडणाऱ्या घडामोडी पत्रकार हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारा जनतेच्या व शासनाचा मधला बिंदू असून तुळजापूर येथे तहसीलदारांनी पत्रकारांनाच अर्वांच्य भाषेमध्ये बोलून अपमानित करण्याची घटना तुळजापूर येथील तहसील कार्यालय येथे घडली असून या बाबत पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक झाली असून तहसीलदार विरोधात धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन पत्रकारांचा अवमान करणाऱ्या तुळजापूर च्या तहसीलदार विरोधात कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन सादर करण्यात आले

 

 

२५ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे बेकायदेशीर वीटभट्टी बाबत सामूहिक आत्मदहन आंदोलन तुळजापूर तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती पत्रकार बांधवांना मिळाल्यानंतर पत्रकार बांधव हे आंदोलनस्थळी बातमी संकलनासाठी गेलो असता तुळजापूर चे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पत्रकारांना बातमी संकलन करत असताना अरेरावी भाषा करीत तुम्ही अगोदर बाहेर जा, शूटिंग करू नका, मला माहित आहे पत्रकार कसे असतात असे म्हणून पत्रकारां बरोबर उद्धट वर्तन करून कार्यालय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच बरोबर उपस्थित पत्रकारांना अपमानित केले.

 

सदर आंदोलन स्थळी तुळजापूर पोलिस निरीक्षक अनिल मांजरे यांच्या मदतीने हे अंदोलन आंदोलनकर्त्यांनी स्थगित करण्यात आले असता पत्रकार बांधव हे आंदोलन बाबत तहसीलदार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी तहसीलदार यांच्या कार्यालयात गेले असता तुळजापूर च्या तहसीलदारांनी पत्रकारांना प्रतिक्रिया न देता अरेरावी ची भाषा वापरून कार्यालयाच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला. देऊन अपमानित केलं आहे

 

याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक भूमिका घेत पत्रकारांना अपमानित करणाऱ्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून धाराशिव चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे त्याच बरोबर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड धाराशिव ,जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी,जिल्हा उपाध्यक्ष रुपेश डोलारे, मकबुल तांबोळी, हैदर शेख,सारिका चुंगे,लहू कुमार शिंदे,चांद शेख,गणेश कांबळे,सलीम पठाण,आकाश हळकुंडे व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here