बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्याच्यावतीने एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

बहुजन क्रांती सेना

अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त उपाधीक्षक मुंबई कांतीलाल जी कोथिंबीर व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागातील एमपीएससी विद्यार्थी उपस्थित राहिले या सर्व मान्यवरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामुळे बोलताना बहुजन क्रांती संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष वामनभाऊ यांनी सांगितले की बहुजन समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून एक विजन हाती घेण्यात आलेला असून त्याचा एक भाग म्हणून आपण आज बहुजन समाजातील एमपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहोत उत्तीर्ण झालेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वर्गांनी भविष्यामध्ये चांगला असं काम करून स्वतःचे नाव लौकिक कमावा व फुले आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करायचं काम आपल्या हातून करावे हे करत असताना गोरगरिबांची कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीची वागणूक ठेवून त्यांना सहकार्य करायचं काम आपल्या हातून गडावर अशी अपेक्षा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद माजी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार तसेच निवृत्त उप अधीक्षक कांतीलाल कोथिंबीर यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे निमित्ताने बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्र पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व तसेच तालुका पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवली सूत्रसंचालन शिवाजीराव त्यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार कांतीलाल कोकाटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here