आमदार मुरजी काका पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वृक्षवाटप; नांदुरकी बुद्रुक येथे वृक्षारोपणाचा उत्साह

आमदार मुरजी काका पटेल

आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | आमदार मुरजी काका पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशन यांच्या वतीने मोफत वृक्षवाटप व वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

चौधरी क्लास शाळा, नांदुरकी बुद्रुक येथे साई प्रतीक प्रतिष्ठान, समस्त नांदुरकी बुद्रुक व समस्त उदावंत परिवार यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन श्री. सखाराम पाटील चौधरी होते. यावेळी श्री. ज्ञानदेव नारायण चौधरी, वीरेश चौधरी, वसंत काळे, वसंत दाभाडे, मुख्याध्यापक आंबेडकर सर, कावरे सर, चावळे मॅडम, सरपंच माधव बाबुराव चौधरी, नामदेव रामचंद्र चौधरी, बापूसाहेब कारभारी चौधरी, शंकर गणपतराव उदावंत तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी गणपतराव लक्ष्मण शेठ उदावंत, सौ. सुनंदा गणपतराव उदावंत, साई प्रतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ शितल शंकर उदावंत, अरुण चौधरी, अंकुश जोगदंड, बाळासाहेब दाभाडे, अरुण चौधरी, अंकुश जोगदंड, बाळासाहेब दाभाडे, बापूसाहेब चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवरांनी वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला.
तसेच प्रतीक शंकर उदावंत यांच्या वतीनेही वृक्षारोपण उपक्रमात विशेष सहभाग नोंदविण्यात आला. साई प्रतीक प्रतिष्ठानचे संपादक भागवतराव गणपतराव उदावंत, पूजा भागवत उदावंत, सानिका शंकर उदावंत, अंकिता भागवत उदावंत, श्रावणी भागवतराव उदावंत, ईश्वरी भागवतराव उदावंत, उपाध्यक्ष पूजा भागवत उदावंत यांच्यासह समस्त उदावंत परिवाराने या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनीही आमदार मुरजी काका पटेल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता समाज आणि पर्यावरणासाठी विधायक उपक्रम राबविण्याचा आदर्श यानिमित्ताने समोर आला.
वृक्ष हे पर्यावरणाचे आधारस्तंभ असून, वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करता वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशातून उपस्थितांना पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. मनोमय हीलिंग हार्ट फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here