जळगांव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राजेंद्र महाजन) : नूतन मराठा महाविद्यालयातील संविधान गौरव महोत्सव निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले, पोस्टर प्रदर्शन, निबंध स्पर्धा ,प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा ,कार्यशाळा व अभ्यासकांची व्याख्याने आयोजन करण्यात आले होते.
यात महाविद्यालयातील एनएसएस, इतिहास, इंग्रजी, राज्यशास्त्र व वाणिज्य या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय राज्यघटने संदर्भात भारतीय राज्यघटनेची ओळख राज्यघटनेच्या विविध बाबी या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत राज्यघटना पोहोचवावी याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयातील जवळपास ८० विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनास भेट दिली व राज्यघटना समजून घेतले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल .पी. देशमुख यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी पाटील डॉ.इंदिरा पाटील, डॉ. आर. बी देशमुख, डॉ. एस आर गायकवाड, इतिहास विभागातील सहायक प्राध्यापक प्रा. वंदना पाटील, डॉ. मंगला तायडे, तेजल पाटील तसेच इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.







