मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या

crime
File Photo

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आधी कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या घालून, नंतर नाक आणि तोंड दाबून पतीची हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईच्या उलवेमध्ये घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उलवे येथील खाडी पुलावर टाकण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास केला असता, पत्नीनं हत्या केली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी तिघांना पोलिसांना अटक केली आहे.

 

पती सचिन मोरे यांच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नी रेश्मा मोरे हिने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. मात्र, पती घटस्फोट द्यायला तयार नव्हता. पण छळ हा सुरूच होता. याच त्रासाला कंटाळून पत्नीनं साथीदार आणि मुलाच्या मदतीनं पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. पत्नीच्या मित्रानं नशेच्या गोळ्या दिल्या. पत्नीनं कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या घालून पतीला दिले. नंतर पतीला रिक्षामध्ये नेत पत्नीनं नाक आणि तोंड दाबून पतीची हत्या केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह उलवे येथील खाडी पुलावर टाकण्यात आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू झाला. तपासादरम्यान रेश्मावर संशय आल्यानं तिचा मोबाईल आणि सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान, घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी उलवे पोलिसांनी आरोपी रेश्मा मोरे सह तिचा मित्र प्रथमेश म्हात्रे आणि रोहित टेमकर या तिघांना अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here