मंगळवेढा तालुका पोलिसांची गांजाविरुद्ध मोठी कारवाई – ८ लाख ७९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त

गांजा जप्त

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) : सोड्डी परिसरात गांजाचे मादक व नशा कारक वनस्पती झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केल्या प्रकरणी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून ४३ किलो ९५८ ग्रॅम वजनाचा गांजा ८ लाख ७९ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सोमण्णा रामण्णा बिराजदार (वय ५८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



दरम्यान ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी सोड्डी परिसरात असलेल्या गट नं 324/1/ब/2 मध्ये गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती नुकताच महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार मिळालेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना मिळतात त्याने पोलिसांचे एक पथक पटवून सदर घटनेची शहानिशा करून घेतली . 




पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी. अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेढ्याचे डी वाय एस पी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची सूत्रे हलवली दिनांक 5 रोजी 3.15 वा. सदर पथक शासकीय गाडीने घटनास्थळी पोहोचले त्यावेळी आरोपी उपस्थित होता. आपल्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत असे पथकाने विचारले असता शेतात जवस सिताफळ चिक्कु पपईची लागवड केल्याचे आरोपीने सांगितले मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे पोलिसांनी शेतामध्ये शोध घेतले असता दगडी घराच्या बांधकामाच्या समोर जवसाच्या पिकासोबत साधारण दोन फुटापासून ते सहा फूट उंचीची लहान-मोठी गांजाची हिरव्या रंगाची पाने फुले व बोंडे असलेली झाडे पोलिसांच्या निदर्शनात आली


याबाबत आरोपीस विचारणा केली असता. गांजा सेवन करण्याची सवय असल्याने ती चोरून लावली असल्याची आरोपीने सांगितले. या कारवाईसाठी तहसीलदार भाग्यश्री जाधव पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे नागेश बनकर अनिल गडदे पोलीस हवलदार दिगंबर गेजगे व पोलीस सचिन बनकर पोलीस अंमलदार महेश कोरे सुरज देशमुख बंडोपंत पुजारी श्रीकांत देवकते चालक हरिदास चौधरी आदींनी परिश्रम घेतले. फिर्याद पोलीस नाईक सचिन बनकर यांनी दिली असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान मंगळवेढा पोलीस दलाला प्रथमच एवढी मोठी गांजा लागवड सापडल्याने खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here