स्वारगेटप्रकरणातील तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला

शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यातील वातावरण तापलं. या प्रकरणात दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. दत्ता गाडेची चौकशी सुरू आहे.

 

अशातच पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे. हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला असून, तरूणीसोबत २५ फेब्रुवारीला नेमका काय प्रकार घडला? हे तरूणीच्या जबाबात सविस्तर मांडण्यात आलं आहे.

 

या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांनी नुकताच जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच रूग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. डेपोच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली होती. गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here