धुळे (जिल्हा क्राइम रिपोर्टर पूर्वा भगत) : शहरातील महानगरपालिकाजवळील दुकानासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या २४ तासात दुचाकी शोधून गाडीमालकास परत दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी गौरव तनेजा यांचे महानगरपालिकेसमोर दुकान आहे. दुकानासमोर लावलेली दुचाकी (क्रमांक एम.एच.१८ २८३९) चोरीला गेली. त्यांनी क्राईम रिपोर्टर प्रशांत सुर्यवंशी आणि पूर्वा भगत यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासह शहर पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत धुळे शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासात तपास लावत गाडी शोधून पत्रकारांशी संपर्क साधला. त्यानंतर दुचाकी मूळ मालकाला परत देण्यात आली.







