सणसवाडीत दोन मटका अड्ड्यांवर शिक्रापूर पोलिसांचा छापा

crime
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : सणसवाडीत दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली आहे. याप्रकरणी दिपक विजय मोरे (वय ३१), आतिष सुखदेव दरेकर (वय ३०), विकी बाळासाहेब हरगुडे (वय २९), प्रवीण बबनराव दरेकर (वय ३३) व सलीम हसन शेख (वय ४९ सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दामोदर तुळशीराम होळकर (वय ४१ रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.सणसवाडी (ता. शिरुर) येथील जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन मटका खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.

त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांनी हॉटेल जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला जाऊन छापा टाकला. यात काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना कागदावर आकडे लिहून देऊन मटका खेळवत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या मटका खेळवणाऱ्या लोकांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य व रक्कम असा अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here