सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये खूनाच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला.आपल्या पतीच्या विम्याचे पैसे मिळावे म्हणून पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्यावर कर्जाचे डोंगर होते.ते त्या कर्जामुळे हताश झाले होते.हे कर्ज फेडण्यासाठी पत्नीने आपल्या पतीची हत्या केली,याबाबत अधिक माहिती अशी की,पतीच्या विम्याच्या पैशांवर पत्नीचा डोळा होता. हेच पैसे घेऊन पत्नीला कर्ज फेडायचे होते.
यासाठी तिने सापळा रचून तिच्या मुलाच्या साथीने आणि मुलाच्या मित्राच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.







