पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : ‘रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ ‘ कडून यशस्वी महिला उद्योजकांचा ‘गौरव करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक अरविंद सुरंगे यांच्याहस्ते एकूण २१ महिला उद्योजकांचा ‘वूमन आंत्रप्रुनर्स अवार्ड-२०२५’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याचे हे ३८ वे वर्ष आहे.यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा शांती श्रीधर, सचिव दीपक टक्कर, माजी अध्यक्ष दीप्ती पुजारी, मनीषा कोनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. ५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम बालकल्याण संस्था (राजभवन, औंध) येथे झाला. कविता अवस्थी, ज्योती नागरे आणि डॉ. सानिका शहा यांना यंदाचा २०२५ चा उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार देण्यात आला. वुमन आंत्रप्रुनर ज्युरी अॅवार्ड संजीवनी अघाव, मनिषा संघवी आणि नेहा नाईकडे यांना देण्यात आले.
याचप्रमाणे फातिमा वर्धावाला, ज्योती कुलकर्णी, धनश्री पाठक, सिमा कुचेरिया, आरती शहा, मनिषा तातेड, मृणाल जोशी, ज्योत्स्ना गर्गे, आशना चोप्रा, गार्गी फडतरे आणि शर्वरी जोशी या उद्योजिकांचाही विशेष स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नीलम बेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन दीपक टक्कर यांनी केले.पुरस्काराच्या ज्युरी समिती मध्ये अरविंद सुरंगे,नीलम बेंडे, दीप्ती पुजारी, मनिषा कोनकर, दीपक टक्कर यांचा समावेश होता. ‘महिला उद्योजकांना पूर्वी इतकीच आजही अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते, पण या समस्या आणि आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास अनेक उद्योगवाढीच्या संधीही मिळत जातात आणि यशही मिळते’, असे मत अरविंद सुरंगे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.







