रेल्वेमध्ये भरती करतो म्हणून गंडा घालणाऱ्या आरोपीला वडूज पोलीसांनी केले जेरबंद

वडूज पोलीसांनी केले जेरबंद

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : रेल्वेमध्ये नोकरीस लावतो म्हणून गंडा घालणाऱ्या दादासा लक्ष्मण रनवरे (रा.दसूर ता.माळशिरस जि.सोलापूर) आरोपीस वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मे २०२२ मध्ये येरळवाडी ता. खटाव जि. सातारा येथील सोमनाथ धोंडीराम बागल यास रेल्वेमध्ये नोकरी लावतो त्या करीता १,००,०००/- रुपये आरोपी दादासो लक्ष्मण रनवरे याने ऑनलाईन स्वरुपात पैसे घेवून नोकरीस न लावता फसवणूक केल्याने वड़ूज पोलीस स्टेशनला सोमनाथ बागल यांचे फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान गुन्हा नोद झाल्यापासून सदरचा आरोपी हा पोलीसांना गुंगारा देवून वेगवेगळया शहरामध्ये राहत होता. त्याचे निश्चित असे राहण्याचे ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती. सदर गुन्हयाचे तपासामध्ये पोलीसांनी त्याचे मोबाईलचे तांत्रिक माहितीचे आधारे व व ओला उबेर प्रवाशी वाहतूक कंपनीतून माहिती घेवून, त्याला सोमवारी (दि.३) पहाटे ६ वाजेच्या सुमारास मोठया शिताफीने कोढवा पुणे येथून ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून अटक केली.

 

आरोपी दादासोो लक्ष्मण रनवरे या व्यक्तीने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास वडूज पोलीस स्टेशनशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, अश्विनी शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.घनश्याम सोनवणे, पो.उ.नि.अमित शिंदे, पो.हवा.शिवाजी खाडे, पोलीस कॉ. गणेश शिरकुळे, पो.हवा. महेश काटकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here