अवैधरित्या गांजा बाळगणारा एमआयडीसी पोलिसांकडून जेरबंद

एमआयडीसी पोलिसांकडून जेरबंद

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील मेहरुण बगीचा परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या इसमास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळ गांजाने भरलेली गोणी आढळून आली. त्याच्या ताब्यातून ९ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून एक इसम हा मेहरुण बगीचा परीसरात गांजा ताब्यात बाळगून विक्रि करण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवर फिरत आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना सांगताच, त्यांनी स्वतः तसेच पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोना योगेश बारी, पोका. नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे यांचे पथक तयार केले.

 

या पथकाने गांजा विक्री करणा-या इसमाचा शोध घेत असतांना, तो शिवाजी महाराज उदयान मेहरुण बगीचा येथे आढळून आला. त्यास चारही बाजुंनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचेजवळ एक गांजा भरलेली गोणी मिळुन आल्याने पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांनी शासकिय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक, फॉरेन्सीक व्हॅन यांना घटनास्थळी पाचारण करुन संशयित मुकेश विष्णु अभंगे (वय ४३ वर्ष, रा कंजरवाडा तांबापुर जळगाव) याला ताब्यात घेतल्यावर त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातून ९ किलो ५२२ ग्रॅम गांजा आणि होंडा युनीकॉर्न मोटार सायकल असा एकुण १ लाख ७ हजार १३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोना प्रदीप चौधरी यांचे फिर्यादीवरुन एनडीपीएस कलम 8 ( क ) 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउनि सचीन नवले, पोका चेतन पाटील करीत आहेत.

 

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, अवैधरीत्या कोणी अंमली पदार्थाची विक्रि करीत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर दयावी. खबर देणा-याचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here