दहावीचा पेपर सोडवताना डोक्यावर फॅन पडल्याने विद्यार्थी जखमी

दहावीचा पेपर

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : दहावीच्या भूमितीचा पेपर सोडवत असताना एका विद्यार्थ्याच्या डोक्यावर फॅन पडला. त्यात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.७) दुपारी १ वाजेदरम्यान मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये घडली. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.


याबाबत मुख्याध्यापक थोरात यांनी सांगितले की, दहावीच्या भूमितीचा पेपर सोडवण्यासाठी शुक्रवारी (दि.७) विद्यार्थी आले. सर्व विद्यार्थी आपाआपल्या वर्गात गेले. मराठा महाविद्यालयाच्या दगडी इमारतीमागील नवीन इमारतीमध्येही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग होते. या इमारतीच्या एका वर्गामध्ये विद्यार्थी पेपर सोडवण्यात मग्न होते.


पेपरची वेळ संपण्यास अवघे १० ते १५ मिनिटे शिल्लक होते. त्यावेळी देव संजय पडोळ या विद्यार्थ्याच्या डोक्यावर फॅन पडल्याने तो जखमी झाला असून, आठ टाके पडले आहेत. ही बाब महाविद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांना समजताच तात्काळ जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, महाविद्यालयाकडून जखमी विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधत माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here