(अजय पांडूरंग शिंदे)
बदलत नाही अशी एकही वस्तु नाही. आपण तर माणूस आहोत. तर चला आपण आपल्या सवयी बदलु लाडक्या मुंबईसाठी फक्त पर्यावरणास पोषक वातावरण तयार करून कोविड – १९ विरुध्द लढा. ‘घरीच रहा. सुरक्षित रहा.’ कोरोना नावाच्या विषाणूमुळे आपले जीवनच बदलुन गेलय म्हणुन करोना काळात उत्सव साजरे करताना नियमाचे पालन करुन पर्यावरण जपूनच उत्सवात साजरा करणे गरजेचे आहे.
विघ्नहर्ता महाराष्ट्राचे विघ्न दुर करण्याकरीता येत आहे. गणेश भक्तांनी शाडु मूर्तीची पुजा करावी जेणेकरुन विसर्जनानंतर चौपाट्यांची होणारी दुरअवस्था टाळता येईल. जोपर्यंत विचारांची दिशा बदलणार नाही तोपर्यंत आयुष्याची दिशा बदलणार नाही. गणेश भक्तांना सुरक्षित अंतर व मास्क वापरणे बंधनकारक आहे. म्हणुन विर्सजनाच्या वेळी गर्दी टाळणे व मनपाच्या नियमांचे पालन करुन जवळच्या कृत्रिम तलावाजवळच विर्सजन केल्याने होणारी गर्दी टाळता येईल. गणेश भक्तांमध्ये सतर्कता असली ना तर उत्सवाचा आनंद द्विगुणीत अनुभवता येईल.







