नाथ फाउंडेशन वतीने शासकीय महारुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा

नाथ फाउंडेशन

जळगांव (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राजेंद्र महाजन) : आज (दि. ८) संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला डॉक्टर व नर्स यांचा सत्कार करण्यासोबतच महिला दिनी जन्मलेल्या मुलींच्या माता व मुलींनाही शुभेच्छा देण्यात आल्या.

 

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून नाथ फाउंडेशन तर्फे महिलांदिनी जन्म झालेल्या मुलींच्या आई ला साडी व लहान बाळाला ड्रेस देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.शासकीय महारुग्णालयातील महिला डॉक्टर व नर्स यांना फुल गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळेस नाथ फाऊंडेशन अघ्यक्ष अशोक लाडवंजारी , राष्ट्रवादी युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी , अल्पसंख्यक महानगर अघ्यक्ष डॉ रिजवान खाटीक , माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे , ओबीसी सेल महानगर अघ्यक्ष नामदेवभाऊ वाघ , राष्ट्रवादी काॅग्रेस महानगर उपंअघ्यक्ष किरणभाऊ राजपुत , सौ सुमन बनसोडे , सौ भारती लाडवंजारी , राष्ट्रवादी महिला आघाडी महानगर सरचिटणीस सौ वर्षा राजपूत , महानगर सरचिटणीस रहिमभाऊ तडवी , राहूल टोके , योगेश लाडवंजारी , वंशीका राजपूत , आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here