रावेर (तालुका क्राइम रिपोर्टर नगीन इंगळे) : शुक्रवारी (दि.७) विजेचा शॉक लागून एका मुंबई मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य अव्वर सचिव यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे आज सकाळी घडली . याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबतचे वृत्त असे की कुसुंबा खुर्द येथील सेवानिवृत्त कर्मचारी जमशेर समशेर तडवी (वय ६२) हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराच्या समोरील व्हरंड्यात उभे असताना लोखंडी अँगल ला स्पर्श झाल्याने त्यात विजेचा करंट उतरल्यामुळे त्यांना विजेचा शॉक लागल्यामुळे ते खाली कोसळले . त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत राजू गुलशेर तडवी राहणार कुसुंबा यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.







