जळगांव जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील
स्त्री हि केवळ जन्म देणारी जननी नसते तर ती कुटुंबाला आकार देणारी समाजाला दिशा देणारी आणि स्वत.चे अस्तित्व निर्माण करणारी एक ताकद असते कधी मायेमुळे वात्सल्याचा झरा होणारी कधी पत्नी म्हणून कुटुंबाला आधार देणारी तर कधी उद्योजिका मार्गदर्शक आणी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात नवा आदर्श निर्माण करणारी स्त्री. याच शक्तिमत्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ .रीमा किरण देसले मॅडम. त्यांचे माहेर पारोळा तालुक्यातील देहू येथील असून सासर धरणगाव तालुक्यातील भोद बुद्रुक येथे आहे विवाहानंतर केवळ संसारात रमण्याऐवजी त्यांनी आपल्या बुध्दिमुत्तेच्या आणी परीश्रमाच्या जोरावर देसले अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आज त्या या कंपनीच्या अध्यक्ष असून व्यवसायिक क्षेत्रात भरीव यश संपादन करत आहेत.
त्यांनी केवळ एका कुटुंबाला नव्हे तर दोन कुटुंबाना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे .त्यां एक आदर्श माता आहेत कारण त्यांनी आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवले आहेत घर संसार व्यवसाय आणी शेती या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत त्यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलले .महिला बचत गट स्थापन करून अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहेत सध्या त्यांच्या चार बचत गटांपैकी तिन्ही जळगाव शहरात कार्यरत असून एक गट भोद बुद्रुक येथे कार्यरत आहेत.त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणी त्यांचे आत्मभान जागृत झाले .समाजात पुरुषप्रधान मानसिकतेच्या सावटाखाली दबलेल्या स्त्रियांना त्यांनी आत्मनिर्भरतेच्या वाटेवर उभे केले रीमा मॅडम उच्चशिक्षित असुनही त्यांनी आपले शिक्षण केवळ कागदावर मर्यादित ठेवले नाहि त्यांनी त्यांचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाच्या आणी समाजाच्या विकासासाठी केला.आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवत असताना त्या आपल्या पतीला शेतीतही मदत करत असतात त्यांच्या पती.कृषी क्षेत्रात कार्यरत असून त्यांची शेती आज सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण ठरली आहेत रासायनिक शेतीकडे वळणार्या काळात त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून नवा आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या शेतात सेंद्रिय पध्दतीने घेतलेले टमाटे फुल कोबी पत्ता कोबी लहसुन वांगे आणी अन्य भाजीपाला हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
मातीशी नाळ जोडुन शेतीतही नावीन्य निर्माण करण्याचा या स्त्रिचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहेत.त्या एक आदर्श पत्नी आहेत कारण त्या आपल्या पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत त्या एक आदर्श गृहिणी आहेत कारण त्या कुटुंबाला एकत्र ठेवतात त्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत त्या समाजाच्या विकासासाठी नेहमीच झटत असतात त्यांचा स्वभाव प्रेमळ आणी सहृदय आहे .त्या कोणाच्याही मदतीला नेहमीच धावून येत असतात कोणाच्याही सुख दु:खात नेहमीच सहभागी होत असतात आणी सर्वाना सोबत घेऊन पुढे जातात स्त्रिला योग्य संधी दिल्यास ती केवळ घर सांभाळत नाहि तर समाजालाही दिशा देऊ शकते ती आई उद्योजिका शेतकरी मार्गदर्शक आणी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकते गो फार्म मंजूर असून ते काम सुरु होत आहे तसेच भविष्यात मका खरेदी शेतकरी उत्पादन कंपनी सुरु करणार असे मॅडम यांचे ध्येय निश्चित केले आहे
आज जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने अशा कर्तृत्ववान परीश्रमी आणी प्रेरणादायी स्त्रिला मन पुर्वक वंदन त्यांच्या प्रवासातून अनेक महिलांना नवा मार्ग मिळावा आणी त्यांनीही आपली स्वप्न पुर्ण करावी ही शुभेच्छां!







