जागतिक महिला दिनी पवई पोलिस ठाण्यात महिला जनजागृती

पवई पोलिस ठाण्यात

मुंबई (उपसंपादक सुनिल पाटील) : जागतिक महिला दिनानिमित्त पवई पोलीस ठाणे, मुंबई येथे महिलांच्या सन्मानार्थ विषेश प्राधान्याने महिला व जेष्ठ नागरीकांसाठी तकार निवारण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास महिला व जेष्ठांनी मोठयाप्रमाण उपस्थितीत दर्शविली. कार्यक्रमामध्ये सहभागी महिलांना स.पो.नि. प्रिती हिरे यांनी गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित महिलांसाठी अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आलेले होते.

 

या कार्यक्रमाचे आयोजन विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सत्यनारायण चौधरी, पोलीस सह आयुक्त (का. व सु.), परमजितसिंह दहिया, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १०, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.८) आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास स. पो. आ. प्रदिप मैराळे, साकिनाका विभाग, मुंबई, व.पो.नि. जितेंद्र सोनवणे, महिला स.पो.नि. प्रिती हिरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व महिलांच्या तकारी ऐकूण त्यांच्या तक्रारींचे योग्य निरसन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमामध्ये महिलांच्या तकारी जाणुन घेण्याबरोबरच त्यांना सायबर फसवणुक जनजागृती, नवीन बी. एन. एस. एस. कायद्याची माहिती, पोलीस हेल्पलाईन नंबर, ऑनलाईन ई एफ. आय. आर. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक महिला दिना निमित्त पवई पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा प्रतिकात्मक चार्ज महिला स.पो.नि. प्रिती हिरे यांना सोपविण्यात आला असुन त्याबाबतची संपुर्ण जबाबदारी म. स. पो. नि. प्रिती हिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्याचप्रमाणे महिला दिनानिमीत्त पोलीस ठाणे हददीतील विविध सोसायटया, चौकांमध्ये महिलांना एकत्रित करून त्यांना असलेल्या न्याय हक्काची व अधिकारांबाबतची जनजागृती करण्यात आली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here